विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिर संपन्न

वेंगुर्ला,दि.३० जानेवारी

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरुकता अभियानच्या माध्यमातून वेंगुर्ला येथे विश्वकर्मा लाभार्थी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराचा शुभारंभ भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान, भाजपा कामगार मोर्चा सावंतवाडी विधानसभा संयोजकपदी निवड झाल्याबद्दल सत्यम नारायण सावंत यांचा शरद चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, शरद मेस्त्री, रसिका मठकर, प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे ऑपरेटर यतीन गावडे व सना शेख आदी उपस्थित होते. ४०० विविध क्षेत्रात काम करणारे २९ कोटीहून अधिक कामगार ई-श्रम पोर्टलमध्ये सहभागी झाले आहेत. बांधकाम कामगार, स्थलांतरित मजुर, घरगुती कामगार, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार हे देखील असंघटित क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांना युएएन, आरोग्य, विमा यासारख्या सुविधा मिळत असल्याचे सत्यम सावंत म्हणाले.