बालगोपालानंद स्वामी यांची वेंगुर्ला नगरवाचनालयास भेट

वेंगुर्ला,दि.३० जानेवारी

रामकृष्ण मिशन (फोंडा) गोवा येथून बेळगांवकडे निघालेले स्वामी बालगोपालानंद (राजकोट), स्वामी आर्चायनंद (गोवा) व आशिष स्वामी (गोवा) यांनी वेंगुर्ला नगरवाचनालयास सदिच्छा भेट दिली.

स्वामी विवेकानंदांचे भाषण ज्या सभागृहात झाले ते सभागृह व इमारत पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. नगरवाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी स्वामीजींच्या आठवणींना उजाळा दिला व वेंगुर्ला भेटी दरम्यानच्या त्यांच्या काही घटना कथन केल्या. यावेळी कार्यवाह कैवल्य पवार, महेश बोवलेकर, उपकार्यवाह माया परब, राजेश शिरसाट, उपकार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, ग्रंथपाल किशोर सावंत, सहाय्यक ग्रंथपाल पूजा धावडे, लिपिक जेनी डिसोजा, मिथून सातार्डेकर आदी उपस्थित होते.