वेंगुर्ला,दि.३० जानेवारी
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी-कोंडुरा येथील श्रीदेव लिगेश्वरचा वार्षिक जत्रौत्सव ३१ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी लघुरूद्र-अभिषेक, श्रीसत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हळदीकुंकू, सायं. ६ वा. सिद्धेश्वर मंडळ (विवेक पेडणेकर) कोंडुरा यांचे भजन, ७.३० वा. स्वरसाधना मंडळ (विनू मठकर) हरिचरणगिरी यांचे भजन, रात्रौ ८.३० वा. खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक तर रात्रौ २ ते पहाटे ६ पर्यंत ग्रामस्थांची भजने होणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन लिगेश्वर ग्रामस्थ मंडळ कोंडुरा-वायंगणी यांनी केले आहे.