धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी,दि.३० जानेवारी

इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फेत धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत भटक्या जमाती –क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण चे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे.

शासन निर्णयानुसार धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष पुढीलप्रमाणे –

लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या- क या मुळ प्रवर्गातील असावा. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे. लाभार्थी कुटुंबाचे स्वत: चे मालकीचे घर नसावे. लाभार्थी कुटुंब हे भूमिहीन असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा. तरी योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्याव, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे यांनी केले आहे.