Kunkeshwar कुणकेश्वर : वाळकेवाडी येथे घरावर वृक्ष कोसळले; लाखो रुपयांचे नुकसान

कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांनी दिली घटनास्थळी भेट;मात्र तलाठी,पोलीस पाटील मराठा सर्वेक्षणामध्ये व्यस्त नाराजी व्यक्त….

देवगड,दि.३० जानेवारी
तालुक्यातील कुणकेश्वर वाळकेवाडी व मिठमुंबरी सिध्दार्थनगर येथील दोन घरांवर मोठे आंबा कलम मुळासकट उन्मळून पडल्याने दोन्ही घरांच्या छप्परांची पडवीची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .सदरची घटना मंगळवार दि.३० जाने रोजी दुपारी २.२० च्या सुमारास घडली.घरातील मंडळी नेहमीप्रमाणे दुपारचे जेवणाच्या गडबडीत असल्याने घराच्या छप्परावर पडलेल्या आंबा कलमामुळे त्यांना धक्का बसला परंतु कोणतीही दुखापत झाली नाही मात्र घराच्या छप्परांचे पडवीचे, बाथरूम तसेच नजीकच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे कोसळून नुकसान झाले आहे.घटनास्थळी कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर,ग्रा प सदस्या सायली वाळके तसेच माजी उपसरपंच नंदा वाळके,तंटामुक्ती अध्यक्ष अनंत वाळके,गणेश वाळके,राजदीप मुंबरकर गणेश वाळके,गजेंद्र वाळके राजू वाळके यांनी भेट देऊन पाहणी केली व घरावरील आंबा कलम हटविण्यास सुरुवात केली महसूल प्रशासनाचे तलाठी एस.जी.नाईक यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.
अधिक माहिती अशी की कुणकेश्वर वाळकेवाडी येथील तात्या नारायण वाळके,संजय नारायण वाळके तसेच नजीकच्या मिठमुंबरी सिद्धार्थ नगर येथील प्रमिला प्रदीप मुंबरकर यांचे रमाई
आवास घरकुल योजनेतील घरावर दु.२.२० च्या सुमारास आंबा कलम उन्मळून पडले व छप्पर तसेच पडवीचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान महसूल प्रशासन मार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यात सुमारे २.५७ लाख रु नुकसान झाल्याचे समजते.