तळेबाजार मच्छीमार्केट नजीक स्थानिक गुन्हा अन्वेक्षण विभागाची कारवाई…

देवगड,दि.३० जानेवारी

तळेबाजार मच्छीमार्केट नजीक मंगळवारी दुपारी १२.५५ च्या सुमारास अवैध रित्या विनापरवाना गोवा बनावटीची मद्याच्या बाटल्या बाळगल्या प्रकरणी सतीश गोविंद थोटम यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई)प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.त्याच्याकडून गोल्डन Ace Blue Fine Whisky च्या १८० ,मिली च्या १४४ बाटल्या अंदाजे रु १४,४००/- चा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.या घटनेसंदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग चे आशिष यशवंत जामदार (३४)यांनी फिर्याद देवगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एम .व्ही.महाडिक करीत आहेत.