वेंगुर्ले येथे गौड सारस्वत ब्राम्हण समाजाचा भव्य मेळावा संपन्न

वेंगुर्ले,दि.३१ जानेवारी
गौड सारस्वत समाज वेंगुर्ला उपसमितीने वेंगुर्ले येथील स्वामीनी मंगल कार्यालयात आयोजित केलेला गौड सारस्वत ब्राम्हण समाज, सिंधुदुर्गचा स्नेहमेळावा व वधुवर मेळावा समाज बांधवांच्या भव्यदिव्य उपस्थितीत संपन्न झाला.
या मेळाव्याचे उदघाटन गौड सारस्वत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांत मेळाव्याचे अध्यक्ष सारस्वत बँकेचे संचालक सुनिल सौदागर, प्रमुख पाहुणे विलींग्डन महाविद्यालय सांगलीचे प्राध्यापक विनायक राजाध्यक्ष, सारस्वत समाज सांगलीचे अध्यक्ष डॉ. विकास कोटणीस, सारस्वत विकास मंडळ कोल्हापूरचे माजी विश्वस्त शरद प्रभावळकर, गौड सारस्वत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी, उपाध्यक्ष रघुवीर उर्फ भाई मंत्री, सचिव संतोष पई, संस्थापक कार्यवाह राजस रेगे आदींचा समावेश होता.
या मेळाव्यात प्रमुख पाहुणे विनायक राजाध्यक्ष यांनी, गेली हजारो वर्षे आपण ज्या डी. एन. ओ. मधून जन्म घेतोय तो पूर्वी आणि या पुढेही आपणाकडे आहे. तो म्हणजे कुशाग्र बुध्दीमत्ता हेच अस्त्र आपल्याकडे कायम रहाणार आहे. आपल्या गौड सारस्वत समाजाला कोणत्याच आरक्षणाची गरज नाही. असे स्पष्ट करीत, आपण आरक्षण न घेता तुम्ही दुसऱ्यांना नोकरी देणारे उद्योजक बना असे आवाहन समाजातील तरूणांना केले.
या मेळाव्याच्या सुरवातीस दिवगंतांना श्रध्दांजली वाहण्यात आल्यानंतर ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. या स्नेहमेळाव्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञातीतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीं डॉ मालविका झांटये (मालवण), कु वैष्णवी प्रभू, कु. ममता प्रभू (आजगांव), अंकित प्रभू-झांटये (आजगांव), अजय प्रभू-खानोलकर (वेंगुर्ला), प्रथमेश नाडकर्णी (कणकवली), अवधुत नाईक (वायंगणी), आशुतोष कुलकर्णी (कुडाळ), मंगेश माणगावकर (होडावडे), राजश्री परूळेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या वर्षीच्या सिंधुदुर्ग जिल्हा सारस्वत मित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेले सारस्वत सामाजातील एक लोकप्रिय व्यक्तीमत्व असलेले सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेचे माजी सभापती प्रमोद कामत आणि वेंगुर्ला तालुका सारस्वत मित्र पुरस्कारासाठी निवड झालेले राज्य परीवहन मंडळात वाहतुक नियंत्रक पदावरून सेवानिवृत्त झालेले न्हैचीआड येथील प्रकाश रेगे या दोघांचाही शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम स्वरूपातील पुरस्काराने गौरविण्यात आले. सारस्वत बँक नेहमीच गौड सारस्वत समाजातील माणसाला सहकार्य आणि मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे मेळाव्याचे अध्यक्ष आणि सारस्वत बँकचे संचालक सुनिल सौदागर यांनी आपल्या भाषणांत सागितले.
त्यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. विकास कोटणीस, शरद प्रभावळकर, रघुवीर मंत्री आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी तसेच सत्कारमुर्ती प्रमोद कामत, प्रकाश रेगे, डॉ. मालविका झांटये व समाजाच्या तालुका अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.
यावेळी वेंगुर्ला उपसमितीचे सदस्य सचिन वालावलकर यांची जिल्हा नियोजन मंडळावर निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच उद्योजक तथा समाजिक कार्यकर्ते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी समाजाच्या मेळाव्यास दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात वधु-वर मेळावा घेण्यात आला. ज्ञातीतील अनेक वधु-वरांनी या मेळाव्यामध्ये आपली नोंदणी केली. संध्याकाळी या मेळाव्याची सांगता झली. या मेळाव्यास सुमारे ५५० ज्ञातीबांधव उपस्थित होते.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी सुधीर झांटये, दिगंबर नाईक, अमोल प्रभू झांटये, अमोल आरोसकर, अमोल खानोलकर, प्रकाश रेगे, जनार्दन शेट्ये, सिमा नाईक, राखी दाभोलकर, डॉ. प्रसाद साळगांवकर, तृप्ती आरोसकर, सुषमा प्रभू-खानोलकर, स्वाती पोतनीस, अमृता पाडगांवकर, स्मिता नाबर यांनी विशेष परीश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल आरोसकर यांनी, संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पुनाळेकर यांनी तर शेवटी आभाराचे काम अमोल प्रभू-झांटये यांनी पाहिले.