आरवली ग्रामपंचायतकडून ख्रिश्चन समाजावर अन्याय ?

गटविकास अधिकाऱ्यांकडे न्यायासाठी ख्रिश्चन समाज संघटनेकडून केलीय मागणी

वेंगुर्ले,दि.३१ जानेवारी
आरवली ग्रामपंचायत दप्तरी १९६४-६५ सालापासून सन १९९३-९४ पर्यंत इमारत क्रमांक ८१७ व ८५१ या इमारती विश्वन समाजाच्या प्रार्थनास्थळे म्हणून आरवली ग्रामपंचायतमध्ये नोंद असलेल्या व आजही या हम्मारती अस्तित्वांत व वापरांत आहेत, आरवली ग्रामपंचायत विभाजन आल्यानंतर सागरतीर्थ ग्रामपंचायतध्ये मालमत्ता हस्तांतरीत करीत असताना या दोन्ही इमारतींची नोंद १९९५ ते २०१० पर्यंत आरवली ग्रामपंचायतकडे नसल्याम्मुळे, सागरतीर्थ ग्रामपंचायतकडे वर्ग केली नाही. त्यामुळे सागरतीर्थ ग्रामपंचायतमध्ये विभाजनानंतर नोंद करण्यात आलेली नाही. पण इतर सर्व सार्वजनिक मालमत्ता वर्ग करण्यात आल्या. त्यामुळे खिश्चन समाजाच्याच या सार्वजनिक वास्तूच्या नोंदी दर तीन वर्षानी होणाऱ्या सर्वेक्षणांत न करण्याचा आरवली ग्रामपंचायतच्या कारभार हा हेतूपुरस्कर किंवा कुणाच्या तरी फायद्यासाठी किंवा ख्रिश्चन समाजाचा व्देष म्हणून केल्या गेल्या असाव्यात असा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. सदरच्या श्रध्दा असलेल्या वास्तूंची नोंद सखोल चौकशी होऊन त्वरीत करावी अशी मागणी ख्रिश्चन समाजाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाने ख्रिश्चन धार्मियांच्या भावना गुंतलेल्या असलेल्या या दोन्ही वास्तुबाबत सखोल चौकशी करून न्याय द्यावा. अन्यथा ख्रिश्चन समाज तीव्र आंदोलन छेडतील असा ईशारा ख्रिश्चन समाज बांधव-भगिनींनी व्यक्त केला आहे.
ज्यावेळी सागरतीर्थ ग्रामपंचायत भागातील सदर प्रार्थना मंदीरास लाईट घेण्यासाठी प्रार्थना मंदिराचा असेसमेंट उतारा आरवली ग्रामपंचायत विभाजनांतून निर्माण झालेल्या सागरतीर्थ ग्रामपंचायतकडे मागणी केली. त्यावेळी सागरतीर्थ ग मपंचायतीने आरवली ग्रामपंचायत विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या सागरतीर्थ ग्रामपंचायत हदीतील सर्व खाजगी मालकी, शासकिय धार्मिक व इतर सर्व मालमत्तांची सागरतीर्थ ग्रामपंचायत दप्तरी नोंदी वर्ग केल्या गेलेल्या आहेत. त्या नोंदीत सागरतीर्थ ख्रिश्चनवाडीतील आमच्या समाजाच्या दोन्ही स्थळांची नोंद केलेली दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. सदर नोंद कधी, कशी, कमी केली यार्ची चौकशी आरवली ग्रामपंचायत येथे केली असता कोणत्याही ग्रामसभेचा, मासिक सभेचा ठराव किंवा हरकत असल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे आरवली ग -मपंचायतकडे त्या वास्तूची १९९४ नंतर कागदपत्रे मागितली त्यावेळी ती उपलब्द नसल्याचे सांगून हात झटकले मात्र माहितीच्या अधिकारांत ग्रामपंचायत कडून १९९४ नंतर नोंदी न केल्याचे मिळालेल्या कागदपत्रांवरून दिसून येते.
आरवली ग्रामपंचायत यांना १९६४-६५ ते १९९३-९४ चा संदर्भ घेऊन इमारत क्रमांक ८१७ व ८५१ पुनर्जिवीत करण्याचा ग्रामसभा व मासिक सभेचा ठराव कायम करून तशा प्रकारची नोंद आरवली ग्रामपंचायत दप्तरी करण्यात यावी. व त्यानंतर सागरतीर्थ ग्रामपंचायत यांचे दप्तरी नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावर आदेश करण्यात यावा. अशी मागणी सागरतीर्थ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य स्मिता बेनित फर्नाडीस, ज्ञानदेव चोपडेकर, धर्मगुरू इलीयांस रॉड्रीग्ज, ख्रिश्चन समाज कमिटी अध्यक्ष पिआग्नेल फर्नांडीस, तसेच सामाजिक कार्यकर्ते दयांनद चौधरी यासह ख्रिश्चन समाज कमिटी सदस्य यांनी वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तसेच कोकण आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केलेली आहे.
आम्ही ग्रा.पं. आरवली ग्रामपंचायतमध्ये चौकशी केली असता सन १९६४/६५ ते १९९४/९५ पर्यंत आरवली ग्रामपंचायत दप्तरी मिळकत क्रमांक ७५ (जुना) व नवीन ८५१ या नंबरबर कौलारु खांब क्रुस (ख्रिश्चन समाजाचे मंदिर) व त्याचप -माणे १९७२/७३ ते १९९३/९४ पर्यंत मिळकतच जुना क्रमांक ९६ व नवीन क्र. ८१७ या नंबरचे घर कौलारु क्रुस (सार्वजनिक स्मशानभूमी) वर्णन असलेली असेसमेंट उताऱ्यात नोंद दिसून येत असून १९९४/९५ नंतर सदर दोन्ही नोंदी पुढील वर्षात आरवली ग्रामपंचायत दप्तरी न केल्याचे दिसून येत आहे.
आरवली ग्रामपंचायत दप्तरी कायमस्वरूपी मालमत्ता यादीत आमच्या धार्मिक दोनही स्थळांच्या नोंदी असताना जाणीवपूर्वक कि आमच्या समाजाचे अस्तित्व नष्ठ करण्यासाठीच हा कुणीतरी अनुचित प्रकार केलेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकारामुळे आम्हा खिश्वन समाजाच्या भावनांना ठेच लागलेली असून आमच्या खिश्वन समाजामधील तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. आमच्या समाजाचा हा अपमान व अन्याय प्रशासनाकडून होत आहे. खिश्वन समाजाच्या प्रार्थनास्थळाचे अस्तित्व दडपण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे तो निषेधार्ह आहे. वेळीच शासनाने ख्रिश्चन समाज्याच्या प्रार्थना स्थळांच्या नोंदी ज्यांच्या चुकीमुळे करण्याच्या राहिलेल्या आहेत, त्याची त्वरीत सखोल चौकशी करून त्या नोंदी तातडीने घालून ख्रिश्चन समाजांस न्याय द्यावा अशी मागणी ख्रिश्चन समाज संघटनेतर्फे करण्यात आली आहे.