महाराष्ट्र स्टुडंट इनोवेशन चॅलेंज उपक्रमामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यश.

कु.विद्या राजकुमार सावंत ही अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेती.

सावंतवाडी दि.३१ जानेवारी

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टुडंट इनोवेशनन चॅलेंज या स्पर्धेमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील एकूण दहा विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यातून तीन विद्यार्थिनींची जिल्हा सादरीकरणासाठी निवड झाली.त्यातून एम ए द्वितीय वर्षातील अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु. विद्या राजकुमार सावंत ही जिल्हास्तरी विजेती झाली आहे.

प्रजासत्ताक दिनी ओरोस येथे कु.विद्या राजकुमार सावंत हिला महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तिच्या प्रकल्पासाठी एक लाख रुपये बीज भांडवल व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले ,संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले ,
यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला .यावेळी संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महावाद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल,प्रा. एम ए ठाकूर , प्रा.सौ निलम धुरी, प्रा. अभिजीत शेटकर उपस्थित होते.
सदर प्रकल्पासाठी तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल,महाविद्यालयातील इनोवेशन समिती व करिअर पक्ष समन्वयक आणि अर्थशास्त्र विभागाच्या
प्रमुख प्रा. सौ . निलम धुरी,करिअर कक्ष समन्वय प्रा. एम ए ठाकूर, प्रा. हर्षद राव, इनोवेशन समिती सदस्य डॉ. संदीप पाटील प्रा.तानाजी कांबळे व प्रा. अभिजीत शेटकर यांचे मार्गदर्शन लाभले.