शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत यांचे पक्षातून निलंबन

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केली कारवाई

कणकवली दि. ३१ जानेवारी(भगवान लोके)

शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत यांचे पक्षातून निलंबन केले आहे.त्याबाबत जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी प्रसिध्दी पत्रक काढले आहे.

दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की,दामोदर सावंत यांनी वेळोवेळी केलेल्या पक्षविरोधी कृती तसेच पक्ष व पक्षाच्या नेतृत्वास सार्वजनिक ठिकाणी वेळोवेळी पक्ष हितास बाधा येईल असे वर्तन केले असल्याचे आढळून आले आहे. तरी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडे आपल्या कृत्याची खातरजमा करून आपणांस उपतालुकाप्रमुख पदावरून निलंबित करण्यात येत आहे. तसेच वरिष्ठांच्या कानावर या सर्व गोष्ठी घातल्या, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार आपले पक्षातून सहा वर्षे साठी बडतर्फ करण्यात येत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी म्हटले आहे.