लढवय्ये नेते सीताराम गावडे यांचा पत्रकार बांधवांकडून सन्मान..!

सावंतवाडी, दि.३१ जानेवारी

सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी अविरत झटणारे लढवय्ये नेते सीताराम गावडे यांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व सोशल मीडिया संघाच्या वतीने आज यथोचित सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी तालुका सकल मराठा संघाच्या अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची फेरनिवड झाल्याबद्दल साईबाबांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सीताराम गावडे यांची सर्वानुमते पुन्हा निवड करण्यात आली. याबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व सोशल मीडिया संघ यांच्या वतीने हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,
पत्रकार प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सचिन रेडकर , विजय देसाई , रुपेश हीराप, प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव, भुवन नाईक, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष अमोल टेंबकर, आनंद धोंड , शैलेश मयेकर, निखिल माळकर, उमेश सावंत , ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, मयूर चराठकर आदि उपस्थित होते.

यावेळी आपण तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी अविरत लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी सांगितले.