भिमगर्जना बौध्द मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान

सावंतवाडी, दि.३१ जानेवारी
भिमगर्जना बौध्द मंडळाच्या वतीने रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्वप्रथम मंडळाचे कार्याध्यक्ष आयु. सुरेश कांबळे व स्थानिक रविवाशी आयु. मोहन कांबळे यांनी पं. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष आयु. मंगेश कदम यांनी सर्वाना मार्गदर्शनमध्ये प्रत्येक घराघरामध्ये दोन दोन डसबिन ठेऊन त्यामध्ये ओला व सुका कचरा ठेवावा. आपले घर व घरातील परिसर स्वच्छ ठेवावे. घरामागील मोठी डबकी असेल तर ती स्वच्छ असावी. या डबकीमुळे डास, जीवजंतू निर्माण होऊन ताप, सर्दी डेंगू यासारखे रोग निर्माण होतात.

मंडळाचे अध्यक्ष आयु. मंगेश कदम पुढे म्हणाले आमच्या मंडळाचे जेष्ठ सभासद दिवंगत दाजीबा भिवा कांबळे यांनी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन केवळ आणि केवळ काम करायचे जास्त बोलेणे त्यांचे नसायचे दिवंगत दाजीबा कांबळे यांनी नोकरीच्या माध्यमातून व करोना काळात अहोरात्र काम करून करोना योध्दा होऊन सावंतवाडी शहराची सेवा केलेली आहे. त्यामुळे आजचे हे स्वच्छता अभियान दिवंगत दाजीबा भिवा कांबळे यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याकरिता समर्पित केलेले आहे असे मंडळाचे अध्यक्ष आयु. मंगेश कदम शेवटी म्हणाले.
सर्वांनी संपूर्ण समाजमंदिर, व परिसर, डॉ बाबासाहेब आंबेडकर . स्मृती उद्यान, व त्याकडील परिसर व इतर परिसर स्वच्छ केला. या अभियानमध्ये मंडळाचे सभासद प्रावी उमर शिवानी पवार वर्षा कदम, ज्योती जाधव, मीनाक्षी पवार. प्रविण कांबळे, निवेद कांबळे, किशोर जाधव सुरेश कांबळे, मोहन कांबळे, वासुदेव कदम, सुरेश खोब्रागडे, प्रशांत पाटणकर, अमन अणावकर, अनिकेत जाधव, हेमंत कांबळे कांबळे, मंडळाचे सचिव रुपेश जाधव व अध्यक्ष मंगेश कदम , तन्मय पाटणकर, आर्यन कदम रहिवाशी अभियानमध्ये सहभागी झाले होते.