मराठा आरक्षण सर्वेक्षण करताना बौध्द समाज अनुसुचित जातीत समाविष्ठ करा..

सर्वे करणारे कर्मचारी चुकीची माहिती देत असल्याची तक्रार ;सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, महाराष्ट्र ची तहसीलदार यांच्याकडे मागणी

कणकवली दि.३१ जानेवारी(भगवान लोके)

मराठा आरक्षण सर्वेक्षण महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. 23 जानेवारी 2024 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये सुरु केले आहे. हे सर्वेक्षण सुरु असताना बौध्द समाजाचे सर्वेक्षण करताना यासाठी बौध्द समाज हा अनुसुचित जातीत समाविष्ठ होणे आवश्यक होते. त्या सर्वेमध्ये बौध्द म्हणून उल्लेख केल्यास तुमची गणना अल्पसंख्यांक किंवा ओपन मध्ये होईल असे सर्वे करणारे कर्मचारी चुकीच्या पद्धतीने सांगत असल्याची तक्रार सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, महाराष्ट्र यांच्यावतीने कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे करण्यात आली आहे.त्यावेळी श्री.देशपांडे यांनी आपल्या निवेदनाची नोंद घेवून वरिष्ठांना कळवतो,तसेच सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील,असे आश्वासन दिले.

यावेळी ॲड . सुदीप कांबळे रमाकांत जाधव , सुशील जाधव , सागर जाधव , रुपेश वरवडेकर , अमित जाधव उपस्थित होते.

कणकवली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात,त्यामुळे लोक घाबरुन सर्वेला घाबरुन सामोरे जात आहेत. यात सर्वे करणा-यांनी आपली कामे तातडीने आटपण्यासाठी वरीष्ठ स्तरावरुन याबद्दलची माहिती न घेताच तसाच सर्वे करुन बौध्द म्हणून सर्वे न करता जुन्या कॉलम प्रमाणे सर्वे केलेला आहे. यामुळे प्रत्येक गावामध्ये बौध्दांची संख्या निश्चितच कमी दिसणार आहे. यापूर्वीही 2001 आणि 2011 मध्ये झालेल्या सर्वे मध्ये अशा चुकांमुळे बौध्द समाजाचे सर्वे व्यवस्थित न झाल्यामुळे बौध्द लोकांची अनुसुचित जातीमध्ये गणना न होता खुल्या प्रवर्गामध्ये झाली होती. यामुळे महाराष्ट्र शासनाचा अनुसुचित जातीचा गावनिहाय होणा-या खर्चापासून अनुसुचित जातीच्या लोकवस्त्या वंशित राहिल्या होत्या . कितीतरी बौध्द लोकवस्त्या असुनही गावांमध्ये अनुसुचित जातीची लोकसंख्या 0 ते 20 दाखवण्यात आली होती. यामुळे या वस्त्या विकासापासून वंचित राहिल्या होत्या. चुकीच्या होत असलेल्या आताच्या सर्वबाबत काही लोकांनी आवाज उठवल्यानंतर ही बाब शासनाच्या लक्षात येवून आता बुध्दीष्ठ सांगितल्यानंतर अनुसुचित जातीचा कॉलम येत आहे. व जणगणनेत बौध्द समाज अनुसुचित जातीचा म्हणून गणना होत आहे. परंतु ही दुरुस्ती होईपर्यंत झालेल्या सर्वेचा डाटा बदलणे आवश्यक आहे. परंतु तो अजुनही सर्वे करणा-या कर्मचा-यांनी बदलेला नाही. किंवा चुकीचा सर्वे घरी जावून परत सर्वे केलेला नाही . चुकीचा झालेला सर्वे बदलणे आवश्यक असुन तशा सुचना आपल्या स्तरावरुन देणे आवश्यक आहे. आणि झालेल्या सर्वेचा तपशिल प्रत्येक कुटंबाला मोबाईल वर मिळणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबतची दखल घेवून सर्वे बाबत बौध्द समाजांच्या मागणीची दखल घ्यावी,असे म्हटले आहे.