कणकवलीत १२० दात्यांचा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण

भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर

कणकवली दि .३१ जानेवारी ( भगवान लोके)

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थानात बुधवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात १२० जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन अनंत सौदागर व भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते झाले.
भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराकरिता १२० दात्यांचा रक्तदान करण्याचा संकल्प संस्थानातर्फे करण्यात आला होता. हा संकल्प देखील पूर्ण झाला. यावेळी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलापपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी दादा नार्वेकर, विजय वळंजू निवृत्ती धडाम, प्रसाद अंधारी उमेश वाळके, दादा नार्वेकर,अँड. प्रवीण पारकर, नागेश मुसळे, डॉ. विद्याधर तायशेटे, मिलिंद म्हसकर, मंदार आळवे, शशिकांत कसालकर, राजेंद्र पेडणेकर, शंकर धुरी, श्रीरंग पारगावकर आदी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बाबांच्या भक्तांचे सहकार्य लाभले.