पेन्शन अदालतीचे 19 मार्च रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.३१ जानेवारी

मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या वतीने पोस्टल विभागातील पेन्शनधारक/ कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी दि. 19 मार्च 2024 राजी पोस्टल पेन्शन अदालत मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयात दुपारी 3 वाजता आयोजित केली असल्याची माहिती सिंधुदुर्ग डाक विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.

निवृत्तीवेतनधारकाच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. ज्यांची सेवेत असताना मृत्यू झालेली आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील निवृत्तीवेतनधाक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पुर्तता झालेली नाही अशा तक्रारींची या डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल.

पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी/ एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढवणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी.च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणाचा विचार केला जाणार नाही. निवृत्ती धारकांनी आपले अर्जाचे तिप्पट प्रति लेखा अधिकारी, अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ बिल्डींग,2 रा मजला मुंबई 400001 ला 19 फेब्रुवारी 2024 किंवा वैयक्तीक (तक्रारीची मोठ्या प्रमाणात/ इतरांच्या वतीने नाही) पाठऊ शकता. त्यानंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.