व्यापारी वर्गाची सक्षम संघटना म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाकडे पाहिले जाते

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा बोर्डिंग ग्राउंडवर येथे संपन्न

मालवण,दि.३१ जानेवारी

आज व्यापारी वर्गाची सक्षम संघटना म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाकडे पाहिले जात असताना या महासंघाने व्यापाऱ्यांचे अनेक विविध प्रश्न सोडविले आहेत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महासंघाच्या बरोबरीने व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणारी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ही संस्थाही सातत्याने तत्पर आहे. आज जिल्ह्यात रेल्वे, विमान सेवा एमआयडीसी, वीज, दूरध्वनी या पायाभूत सुविधा असतानाही या सुविधांमध्ये अनेक अडचणी आणि गैरसोयी असल्याने यावर शासन स्तरावर काम करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स व्यापारी महासंघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांनी मालवण येथे बोलताना केले.

मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर सुवर्ण महोत्सव मालवण व्यापारी संघाच्या आयोजनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा आज संपन्न झाला. यावेळी प्रमुख उदघाटक म्हणून डॉ श्रीकृष्ण परब हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, आमदार वैभव नाईक, अनिल सौदागर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, माजी जिल्हाध्यक्ष व कार्यवाह नितीन वाळके , सारस्वत बँक संचालक सुनील सौदागर, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे संस्थापक व सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल, आय लीड ट्रेनिंग संचालक विनोद मेस्त्री, स्मार्ट अर्किटेक निहार साईल, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, उपाध्यक्ष सागर शिरसाट, उपाध्यक्ष महेश नार्वेकर, उपाध्यक्ष संजय भोगटे, राजन नाईक, मधुकर नलावडे, संतोष कुडाळकर, राजेश शिरसाट, मंगेश गुरव, निलेश धडाम, सिद्धेश केसरकर, आनंद नेवगी, दिपक भोगले, हर्षल गवाणकर, सद्गुरु तांडेल, नंदन वेंगुर्लेकर, अशोक गाड, अभय सातार्डेकर, अवधूत शिरसाट, पुंडलिक दळवी, श्रीराम शिरसाट, विवेक खानोलकर, तेजस आंबेकर, जगदीश मांजरेकर, प्रमोद ओरसकर, शैलेश कदम, दिपक बेलवलकर, प्रशांत नाईक, रघुनंदन राणे, वामन आचरेकर, सिताराम कराळे, प्रवीण गाड, संजय कुशे, रोहिदास तारी, सचिन मेहंदळे, अविनाश नरे, राजा शंकरदास, गणेश प्रभुलीकर, रवी तळाशीलकर, मंदार ओरसकर, आदी मान्यवर व व्यापारी बांधव उपस्थित होते

प्रारंभी उमेश नेरुरकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी राजू जठार यांनी अहवाल वाचन केले.

यावेळी बोलताना डॉ. श्रीकृष्ण परब यांनी मालवणच्या मेळाव्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला मिळालं याचेच समाधान वाटते. मी माझ्या उद्योगांत कार्यरत असताना आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये काम करताना व्यापारी व उद्योजक यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज कुडाळ येथे जी एमआयडीसी आहे ती रेसीडेन्सीयल आहे त्यात उद्योगधंदे हवेत मात्र त्याचा वापर जॉगिंग साठी केला जात आहे चिपीला विमानतळ आहे मात्र त्याठिकाणी उतरणारी विमाने कॅन्सल होतात त्याठिकाणी विमानाचे नाईट लँडिंग आवश्यक आहे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेना सिंधुदुर्गात थांबे दिले पाहिजेत यासाठी सर्वांनी एकत्र यावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी व्यापारी बांधवांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना आम. वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी व्यापारी महासंघाचे योगदान महत्त्वाचे आहे. आज आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहणार आहोत. व्यापारी संघाची एकी अनेक बदलांना कारणीभूत ठरलेली आहे. बदलांचा अभ्यास करून आपला उद्योग पूढे घेऊन जावा,असे ते म्हणाले.

यावेळी कॅटचे संस्थापक प्रविण खंडेलवाल यांनी छोट्या व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणातील व्यवसायामध्ये सहभाग मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने भारत इ मार्ट ही वेबसाईट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रसाद पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आशिष पेडणेकर, सुनील सौदागर यांचीही समयोचित भाषणे झाली कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश प्रभुलकर, विजय केनवडेकर, नितीन वाळके यांनी केले.