सायबर गुन्हे आणि उद्योजकता कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यक्रम

देवगड, दि.०१ फेब्रुवारी 
जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, सोमलेवाडी येथे सायबर गुन्हे प्रतिबंध व उपाय तसेच औद्योगिक विकास मार्गदर्शन असे दोन्ही कार्यक्रम ३० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. दुपारी ठिक ३.०० वाजता पोलिस उपनिरीक्षक . दशरथ चव्हाण साहेब यांनी उपस्थित सर्वांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाल व श्रीफळ देऊन श्री. चव्हाण यांचे स्वागत सोमलेवाडीचे काजु उद्योजक मिलिंद सोमले यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच.सौ.दक्षता मेस्त्री होत्या. तसेच माजी उपसरपंच दिनेश मेस्त्री, गावचे पोलिस पाटील मंगेश आलव आंबा व्यावसायिक हरिश्चंद्र ऊर्फ नाना गोडे,. अनंत गोडे,.विश्वनाथ सोमले, . दुर्योधन येदरकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. पठाण , सहाय्यक शिक्षिका सौ. कुशे आणि श्रीमती आंधळे उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले आणि महात्मा गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी मोबाईलचे फायदे – तोटे यावर सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे मार्गदर्शन केले. सुमारे दोन ते अडीच तास यांनी विनोद आणि गंभीर शैली वापरुन श्रोतुवर्गाला खिळवून ठेवले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला. अधूनमधून साहेबांनी प्रश्नही विचारले. त्यानंतर काजु उद्योजक मिलिंद सोमले यांनी कोणताही उद्योग करताना संयम, चिकाटी व जिद्द हे गुण का आवश्यक आहेत हे स्वतःचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विनाकारण मोबाईल का वापरु नये, त्यापासून कोणती हानी होते हे समजावून सांगितले.
या दोन्ही मार्गदर्शन वर्गांना वाडीतील काहीं प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, महिला वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व आजी – माजी विद्यार्थी, पाटगांव येथील पेंढरी हायस्कूल मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, सोमलेवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. साऊंड सिस्टीमची जबाबदारी अनंत धुरी यांनी सांभाळली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पठाण यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.