वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली येथे वण वणवा सप्ताहास सुरुवात

कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)

वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली येथे १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत वण वणवा सप्ताह साजरा केला जातो.या कालावधीत वण वणवा या विषयी समाजामध्ये जन जागृती केली जाते.या सप्ताहाचा शुभारंभ कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालय येथे करण्यात आला.

यावेळी वनक्षेत्रपाल कणकवली राजेंद्र घुनकीकर , वनपाल भिरवंडे श्रीम.कांबळे , वनपाल दिगवळे सर्जेराव पाटील ,वनरक्षक सुखदेव गळवे, पूजा चव्हाण, सिद्धार्थ शिंदे, प्रतिराज शिंदे,वनसेवक म. ल. गुडेकर,कृ. अ. पाताडे,
म.के. सावंत कार्यालयीन कर्मचारी जयमाला राठोड,अपेक्षा सुतार,संतोष आंबेरकर मधुकर सावंत उपस्थित होते.