कणकवली निवासी नायब तहसीलदारपदी मंगेश यादव

कणकवली दि .१ फेब्रुवारी (भगवान लोके)

कणकवली निवासी नायब तहसीलदारपदी मंगेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.श्री. यादव यांनी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

देवगड तहसीलदार कार्यालयात उपलेखापालपदी असलेल्या मंगेश यादव यांना नायब तहसीलदार पदी बढती मिळाली असून त्यांची कणकवली नायब तहसीलदार पदी नेमणूक
करण्यात आली. मंगेश यादव यांची महसूल खात्यात ३३ वर्षे सेवा झाली आहे.१९९१ साली त्यांनी तलाठी पदी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे शासकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर मालवण तालुक्यात ५ वर्षे, कणकवली तालुक्यात ५ वर्षे तलाठी पदी काम केले. त्यानंतर मंडळ अधिकारी पदी बढती मिळून त्यांनी कसाल मंडळ अधिकारी पदी काम केले. तसेच कणकवली तालुक्यात तळेरे मंडळ
अधिकारीपदी काम केले आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.