कनेडी येथे माघी गणेश जयंती निमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने आयोजन

कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त रविवार दिनांक ११ फेब्रूवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन गटात होईल.गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

गट १ ते ४ थी विषय – १) माझे घर,२) बगिचा (गार्डन ),३) माझे गाव आहेत,त्यांना अनुक्रमेप्रथम ७००,द्वितीय ५००,तृतीय ३००,उत्तजनार्थ दोघांना २०० रुपये आणि गट ५ते ७ वी.विषय.१) गणेश जयंती,२) वनभोजन,३)आवडता खेळ विजेत्यांना अनुक्रमे प्रथम १०००,द्वितीय ७००,तृतीय ५०० व उत्तजनार्थ दोघांना २०० रुपये देण्यात येणार आहेत.

तसेच गट ८ते १० वी.विषय१) आवडता सण,२) कोरोना काळातील योद्धे ,३) दशावतारातील नाटकातील कोणताही एक प्रसंग अनुक्रमे प्रथम १५००रू, द्वितीय १०००,तृतीय ७००,उत्तजनार्थ दोघांना ३०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहेत.

तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठान अध्यक्षा तथा माजी जि. प. अध्यक्षा संजना संदेश सावंत , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वतीने करण्यात येत आहे. नावनोंदणी व
अधिक माहितीसाठी संपर्क श्री संदीप तांबे सर ९४२२५६५२८० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.