कणकवली येथे राज्यस्तरीय लोककला ग्रुपडान्स स्पर्धा

कणकवली सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजन

कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकल मराठा समाज कणकवली यांच्यावतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे औचित्य साधून राज्यस्तरीय लोककला ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धा खुल्या स्वरुपात घेण्यात येणार आहेत.

पारंपरिक लोककला ही देशातील प्रांतिक कलागुणांना वाव देणारी आहे. सदर स्पर्धा खुल्या स्वरुपाची असून विविध बक्षीसांची खैरात होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी १ हजार रुपये आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रुपये 21000 व चषक , द्वितीय क्रमांकासाठी रुपये 15000 व तृतीय क्रमांकासाठी रुपये 11000 व उत्तेजनार्थ 5000 रुपये दोन बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी संपर्कमहेंद्र सांब्रेकर 7249711277 , भाई परब 9422381124 , बच्चू प्रभुगांवकर 9422632621 क्रमांकावर करावा.