निगुडेमध्ये दोन फूट मगरीच्या पिल्लाला जीवनदान

बांदा,दि.१ फेब्रुवारी
निगुडे येथे कालव्याजवळ खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या दोन फुटी मगरीच्या पिल्लाला ग्रामस्थांनी जीवनदान दिले. शिवसेना इन्सुली विभाग प्रमुख राजन परब यांनी त्या मगरीला पकडून इन्सुली येथील प्राणीमित्र काका चराटकर यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडले.
मगरीचे लहान पिल्लू असल्याने मोठी मगर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.