तिलारी घटात टॅकर अडकून गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्ग पुन्हा बंद

पर्यायी मार्ग नसल्याने साठ ते ८० किलोमीटरहून फेरा मारून आंबोली चोर्ला घाट मार्गे जाण्याची वेळ

दोडामार्ग, दि .१ फेब्रुवारी

तिलारी घटात सिमेंट केमिकल पावडर घेऊन जाणारा टॅकर अडकून गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्ग पुन्हा बंद प्रवाशांचे हा वेळोवेळी अवजड वाहने बंद करावी अशी मागणी करुन देखील बांधकाम विभाग चंदगड यांची डोळेझाक पर्यायी मार्ग नसल्याने साठ ते ८० किलोमीटरहून फेरा मारून आंबोली चोर्ला घाट मार्गे जाण्याची वेळ एस टी बसेस अडकून जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात तीन वेळा पंधरा तास घाट बंद झाला असताना बुधवारी मध्यरात्री कर्नाटक येथे सिमेंट करीता लागणारी पावडर केमिकल भरलेला ३४ टन टॅकर ट्रक अडकून पडला होता त्या ठिकाणी धोकादायक वळणावर अडकून पडल्याने वाहतूक बंद झाली चंदगड दोडामार्ग पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहने पर्यायी मार्गाने वळवली. तर एस टी बसेस बस स्थानक तर तिलारीनगर येथे थांबवले तिलारी घाटात अवजड वाहने यामुळे सतत अपघातात वाढ होत असताना बांधकाम विभाग चंदगड काही उपाययोजना करताना दिसत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. हा टॅंकर एका बाजूने वाकत चालला होता त्यामुळे तो पलटी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. जवळपास पंधरा तास उलटून देखील तो बाजुला करण्यासाठी प्रयत्न झाले नव्हते. घटना स्थळी चंदगड दोडामार्ग पोलिस यांनी पाहणी केली. टॅंकर मालकाला तातडीने वाहन बाजुला करायला सांगितले पण हालचाली झाली नाही पोलिसांनी टॅंकर चालकांवर गुन्हा दाखल करणार असे सांगितले.