शाळा झाराप कामळेवीर चा वार्षिक आजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आनंदात संपन्न

सावंतवाडी,दि. ०१ फेब्रुवारी

शाळा झाराप कामळेवीर चा वार्षिक आजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आनंदात पार पडला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा कामळेविरचा आजी माजी विद्यार्थ्यांनी 25 व 26 जानेवारी 2024 हे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री परशुराम तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गंगाराम रेडकर शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष सौ.शितल आळवे माता पालक संघ उपाध्यक्ष सौ.संजना गुडेकर तसेच या तिन्ही समितीचे सदस्य व शाळेचे शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा अतिशय आनंदात पार पडला यानिमित्त पहिल्या दिवशी आजी-माजी विद्यार्थी विचारमंथन शालेय विद्यार्थी बक्षीस वितरण व त्यानंतर हा खेळ संचिताचा हे पौराणिक आजी-माजी विद्यार्थ्यांचा नाट्य प्रयोग उत्कृष्ट प्रकारे सादर केला गेला त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री दीपक गोवेकर माजी विद्यार्थी प्रमुख उद्घाटक सौ अलका रेगे माजी शिक्षिका प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त मुख्याध्यापक नेमळे हायस्कूलश्री किरण विटे सर झाराप सरपंच सौ. दक्षता मिस्त्री सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन मांजरेकर माजी शिक्षिका सौ.मांजरेकर मॅडम शिवप्रतिष्ठान ग्रुप कामळेवीर सदस्य गंगाधर गोवेकर निवृत्त केंद्रप्रमुख मांजरेकर ग्रामपंचायत सदस्य श्री अश्फाक कुडाळकर वश्री विपुल मयेकर व्यवस्थापन अध्यक्ष श्री.गंगाराम रेडकर तसेच सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक कदम शिक्षक निरवडे कर मॅडम राऊळ मॅडम यादव मॅडम माजी शिक्षिका बाबडी मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त सूत्रसंचालन साळगावकर व आभार प्रदर्शन प्रवीण गोवेकर यांनी केले