मुणगे जत्रोत्सवात सप्तसुरांचा संगम!

शालेय विध्यार्थ्यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

मसुरे,दि. ०१ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)

संगीता मध्ये सूर, ताल आणि लय याला अतिशय महत्व आहे. संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. संगीता मधील

अशाच सूर, ताल आणि लय याचा अनोखा मिलाफ झाला होता तो देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवालयात! निमित्त होते ते वार्षिक जत्रोत्सवाचे. मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध भक्तीगीत, भावगीत, गजर सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवत बक्षिसांची सुद्धा लयलूट केली.
कार्यक्रमाचा प्रारंभ ‘मी शरण तुला भगवंता’ या भक्ती गीताने रिया अरविंद सावंत हिने केला. तर ‘माय भवानी तुझे लेकरू’ हे गीत चैतन्य रूपे, ‘देव देव्हाऱ्यात नाही’ हे भक्ती गीत अनुराधा आनंद कदम हिने तर ‘देव माझा विठू सावळा’ हे गीत समर्थ पाडावे यांनी सादर केले. यानंतर ‘मंदिरात अंतरात तोच नांदत आहे’ हे भक्ती गीत मृगाक्षी मंगेश हिर्लेकर हिने तर स्वामी समर्थ भक्तीने प्रेरित होऊन ‘अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो’ हे गीत दक्षेश गुरूप्रसाद मांजरेकर याने सादर केले. प्रशालेच्या कलाशिक्षिका सौ.गौरी तवटे यांनी ‘गजानना श्री गणराया’ हे भक्ती गीत तर ‘आई एकविरा पावली’ हे गीत जय सावंत याने सादर केले. ‘मुणगे गावची देवी भगवती’ हे गीत श्रेयस सावंत, सिद्धेश म्हापणकर यांनी तर ‘तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता’ हे गीत देवांग रघुनाथ मेस्त्री याने सादर केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमांमध्ये ‘मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी’ हे भक्तीगीत अनन्या राजेश गावकर हिने तर ‘हरी ओम स्वामी समर्थ म्हणा’ हे गीत रितेश आईर आणि :कीर्ती गाजते मुणगे गावच्या आई भगवती देवीची’ हा गजर आदेश विनोद सावंत यांनी सादर केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ हा स्वामी मंत्र सिद्धेश म्हापणकर तर ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा’ हे गीत ईश्वरी सुभाष राणे हिने तर ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे भक्ती गीत लीनांगी विश्वास मुणगेकर हिने सादर केले. यानंतर ‘जगत जननी अंबामाता’ हे गीत पार्थ विजय गावडे, ‘विष्णुमय जग सारे’ हे गीत सृष्टी सावंत तर ‘जगी जीवनाचे सार’ हे गीत लिनांगी विश्वास मुणगेकर हिने सादर केले. ‘निसर्गरम्य गाव मुणगे’ हा गजर श्रेयस सावंत याने तर ‘उठ पंढरीच्या राया’ हे गीत सौ. गौरी तवटे यांनी सादर केले. यानंतर प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी ‘शंभो शंकरा करुणा करा’ हे भक्ती गीत तर झुंजार पेडणेकर यांनी ‘स्वामी कृपा कधी करणार’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे गुरु प्रसिद्ध भजनी बुवा श्री राजेंद्र प्रभू यांनी सुद्धा ‘हेचि दान देगा देवा’ ही भैरवी सादर करत कार्यक्रमाला चार चांद लावले. कार्यक्रमासाठी टाळ शशिकांत लब्दे, तबला शैलेश सावंत तर हार्मोनियम साथ भजन सम्राट राजेंद्र प्रभू यांची लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, प्रियंका कासले, सुविधा बोरकर यांचे सहकार्य लाभले. श्री भगवती देवस्थान कमिटीच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक यांना कल्पवृक्षाचे रोप आणि आई भगवतीचा प्रसाद देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन शिक्षिका सौ गौरी तवटे यांनी केले. कार्यक्रम सादर करण्याची संधी दिल्याबद्दल श्री भगवती देवस्थान कमिटीचे यावेळी आभार मानण्यात आले.