मोंड येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर झाल्यास ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल…

देवगड,दि .१ फेब्रुवारी
तालुक्यातील मोंड येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर झाल्यास मोंड व पंचक्रोशीतील गावांना बीएसएनएलच्या मोबाईल रेंज चा फायदा होईल काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार नितेश राणे यांच्यासोबत अधिकारी वर्गाची बैठक संपन्न झाली यावेळी आपल्या विभागामार्फत मोंड येथील गावचा मोबाईल टॉवर आश्वासित केल्याप्रमाणे तो मंजूर करून पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सोय करावी अशी मागणी मोंड गावच्या सरपंच सौ.शामल अनभवणे यांच्या समवेत उपसरपंच अभय बापट सदस्य सौ.वैशाली अनभवणे ,प्रदीप कोयंडे ग्रामस्थ राजेंद्र अनभवणे यांनी उपविभागीय उपमंडल अभियंता बीएसएनएल देवगड यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या पत्राच्या अनुषंगाने उपमंडल अभियंता देवगड यांनी मोंड गावात बीएसएनएल करण्याचे निश्चित केले असून मोड गावात गावठाण मोकळ्या जागेची (२०० चौ मी) आवश्यकता आहे याकरिता शासकीय जागा उपलब्ध व्हावी तसेच वीज व रस्ता नजीक असावा या संदर्भातील आवश्यक ती माहिती एक आठवड्यात बीएसएनएल देवगड येथे कागद पत्रासहित एक आठवड्यात कळविण्यात यावे असे लेखी पत्र सरपंच, /ग्रामविकास अधिकारी,/ तलाठी याना दिले आहे.