अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेले बजेट नक्कीच भारताला आर्थिक दृष्ट्या पुढे घेऊन जाईल-मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी दि.१ फेब्रुवारी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेले बजेट नक्कीच भारताला आर्थिक दृष्ट्या पुढे घेऊन जाईल असा विश्वास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला ते आज सिंधू रत्न योजनेच्या आढावा बैठकीसाठी मळगाव येथे आले होते यावेळी ते बोलत होते..
केसरकर म्हणाले, गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामण यांनी बजेट मांडले ते देशाला पुढे घेऊन गेले आहे भारताची प्रगती झाली आहे त्यामुळे भारत जगात पाचव्या क्रमांकावर स्थान प्राप्त करू शकला निवडणुकामुळे त्यांनी आज अंतर बजेट मांडला असला तरी या बजेटवर अभ्यास करून आपण सविस्तर बोलेन आज बैठकामुळे जे शक्य झाले नाही असे त्यांनी सांगितले.