कुंभवडे गावातील ग्रामस्थ याना कल्पना न देता धान्य वितरण चौकुळ येथे हलविले संतप्त ग्रामस्थ यांची दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे धडक

दोडामार्ग, दि. १ फेब्रुवारी

गेल्या काही वर्षापासून दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावातील ग्रामस्थ यांना तळकट येथून रास्त दराचे धान्य वितरण केले जात असताना येथील रेशनकार्ड धारक लाभार्थी यांना पूर्व कल्पना न देता लाभार्थी यांच्या खोट्या सह्या करून कुंभवडे गावातील ग्रामस्थ यांना चौकुळ रास्त दराच्या दुकानातून धान्य वितरण करावे असा अर्ज करण्यात आला ही माहिती सयजताच संतापलेल्या कुंभवडे गावातील लाभार्थी यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे धडक मारून तहसीलदार याना आम्हाला तळकट येथून धान्य वितरण करावे अन्यथा धान्य आनंदाचा शिदा स्विकारणार नाही असा इशारा देत जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असे सांगितले. तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा केली. लाभार्थी यांच्याशी खातरजमा केल्याशिवाय धान्य वितरण हलवू नये असा इशारा दिला.