कणकवली पोलीस उपनिरीक्षक महेश शेंडगे ;सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवलीच्या वार्षिक क्रीडा महोत्सव
कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)
आपण विद्यार्थी उज्वल भारताचे भविष्य आहात.यामुळे आयुष्यात कुठच्याही स्पर्धेत भाग घेऊन ताकदीने लढायचे आहे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावे असे प्रतिपादन कणकवली पोलीस उपनिरीक्षक महेश शेंडगे यानी केले.
ते सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवलीच्या वार्षिक क्रीडा महोत्सवा प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमाचे पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष वसंत सावंत, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री तुकाराम केदार,प्राचार्या रोहिणी विचारे, कृषी कॉलेजच्या प्राचार्या डॉ .मनीषा अपराज, पदवीका विभागाचे प्रमुख संजय चोथे तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
पुढे बोलताना शेंडगे म्हणाले,विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात चांगली कामागिरी कशी करावी व स्पर्धा परीक्षेमधील असणाऱ्या संधी यावर काॅलेज करताना भर द्यावा.यानंतर त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ घेऊन राष्ट्रगीत म्हणून स्पर्धेला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा.उज्वला खेडकर यांनी केले.