जिल्ह्यात दर्जेदार प्रकल्पांना सिंधु रत्न योजनेतून अनुदान देण्यात येणार-मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी दि.१ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र व्हावे म्हणून आमचा प्रयत्न आहे यासाठी पर्यटन जिल्ह्यात दर्जेदार प्रकल्पांना सिंधु रत्न योजनेतून अनुदान देण्यात येत असल्याची माहिती सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर रेल हॉटेल, टर्मिनस इमारत आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला.
मळगाव येथे सिंधू रत्न योजनेची आज बैठक झाली या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी किशोर तावडे, राजन पोकळे, सचिन वालावलकर, उपवनसंरक्षक नवल किशोर रेड्डी ,सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यानंतर पत्रकार परिषद झाली यावेळी केसरकर बोलत होते
केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्जेदार पर्यटन व्हावे आणि तेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे असा आमचा प्रयत्न आहे यासाठी सिंधू रत्न योजनेतून योग्य त्या प्रकल्पांसाठी अनुदान दिले जाते आणि त्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो असे त्यांनी सांगितले सावंतवाडी मळगाव रोड रेल्वे स्थानकावर पर्यटनदृष्ट्या रेल हॉटेल, टर्मिनस इमारत आणि पर्यटन सुविधा केंद्र निर्माण व्हावे यासाठी निर्णय झाला असून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून रेल्वेला रस्ताही मंजूर झाला आहे या महत्त्वाच्या प्रकल्पांचे आराखडे व रेखाचित्रेही तयार आहेत हल्लीच मुंबईमध्ये कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक पर्यटन अधिकारी आर्किटेक व अन्य अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये टर्मिनस प्लॅटफॉर्म वर सुविधा देण्याबाबत देखील निर्णय झाला आहे असे त्यांनी सांगितले.
तिलारी मधील पर्यटन प्रकल्पाला देखील मान्यता देण्यात आली याशिवाय नापणे आणि सावडाव येथील धबधबे बाबतीत निर्णय झाला तेरेखोल व तारकर्ली येथील बॅक वॉटर्स प्रकल्पाबाबत निर्णय आज घेण्यात आला सिंधुदुर्ग ग्रामस्थांनी पर्यटनामध्ये आपली गुंतवणूक करावी यासाठी सिंधुदुर्ग सिंधू रत्न योजनेतून पाच रूमचा रिसॉर्टला मान्यता देण्याचे ठरविण्यात आले.टेन्ट प्रकल्प देखील मंजुरीसाठी आले आहेत त्यांचा विचार केला जाईल पण पाच रूमचे रिसॉर्ट जे करू इच्छितात त्या योग्य प्रकल्पना दर्जेदार पर्यटनासाठी मान्यता दिली जाईल दर्जेदार पर्यटन झाले पाहिजे आणि त्यात स्थानिकांची गुंतवणूक पाहिजे असा आपला प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.
वेंगुर्ला तालुक्यातील उभादंडा येथे पर्यटन गाव आहे मात्र या ठिकाणी कवितांचा गाव म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी कविता साहित्य ठेवून पर्यटनदृष्ट्या या ठिकाणी पर्यटनांची गर्दी वाढेल वाचन संस्कृती वाढेल यासाठी प्रयत्न आहे त्यासाठी पुस्तके, कविता, काही पुस्तकांचे मराठी भाषांतर सुद्धा करून ठेवण्याचा विचार असून पर्यटन प्रकल्पाला साहित्याची पर्वणी देखील लाभायला पाहिजे असे उभा दंडामध्ये गाव निर्माण करण्यात येईल असे केसरकर यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्वाॅयर बोर्डाकडून विविध प्रकल्प राबवून महिलांना रोजगाराची संधी देण्याबाबत प्रयत्न सुरू असून क्वाॅयर बोर्डाने प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यानंतर व्यवसाय सुरू होईल त्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील कौशल्य आणि गुणवंत विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे भारत आणि जर्मनीचा तसा करार झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नर्सिंग हॉटेल मॅनेजमेंट वायरमन टर्नर फिटर अशा विविध कौशल्य असणाऱ्या मुलांना ही संधी मिळणार आहे जिल्ह्यातील रत्न सिंधू योजनेच्या कार्यालयामध्ये समन्वय म्हणून मुलांना पाठपुरावा करण्याची संधी मिळेल तेथे संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याही खात्याच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येत असल्याचे केसरकर म्हणाले.