कणकवली नगरवाचनालयातर्फे आयोजित बँ.नाथ पै वक्तृत्व स्पर्धेत तनिष्का सावंत प्रथम

द्वितीय मंदार वरक, तृतीय मेधा दळवी तर उत्तेजनार्थ पायल शिरसाट, तेजल सावंत यांनी पटकाविले

कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली नगरवाचनालयातर्फे आयोजित केलेल्या बँ.नाथ. पै वक्तृत्व स्पर्धेत तनिष्का सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवला.

मंदार वरक याने द्वितीय तर मेधा दळवी हिने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक पायल शिरसाट व तेजल सावंत हिने पटकाविले. या स्पर्धेत १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षण लक्ष्मण प्रभू व रामचंद्र राऊळ यांनी केले. समाज व्यवस्थेला नाथ पै यांच्या विचारांची गरज व आजची परीक्षा पद्धती व गुणवता हे स्पर्धेचे विषय होते. स्पर्धेचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित झाले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी, तानवडे, कार्यकारिणी सदस्या वैजयंती करंदीकर, श्रीमती तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ग्रंथापाल व कर्मचाऱ्यांच सहकार्य लाभले.