पर्यटनमंत्र्यांनी कोकणातील पर्यटन उपक्रम मंजुरी दिली नाही…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  कोकणात सभा घेऊन काय करणार ? मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी दि.१ फेब्रुवारी

मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणाच्या हितासाठी काही केले नाही तसेच पर्यटनमंत्र्यांनी कोकणातील पर्यटन उपक्रम मंजुरी दिली नाही त्यामुळे आता ते कोकणात सभा घेऊन काय करणार ? असा खोचक प्रश्न शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर ते बोलत होते.यावेळी त्यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचाही अप्रत्यक्ष समाचार घेतला.
मळगाव येथे सिंधू रत्न योजनेच्या बैठकीसाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते ते येत आहेत ते निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचारासाठी येऊ दे मात्र त्यांनी ते मुख्यमंत्री असताना आणि आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना कोकणच्या भल्यासाठी हितासाठी काय केलं त्यांनी काहीच केलं नाही त्यामुळे आता सभा घेऊन काय करणार? उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण आणि सावंतवाडी मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळालेला आहे हे आम्ही करून दाखवलं आणि त्यांनी सर्व प्रकल्प रखडून ठेवले ते प्रकल्प विद्यमान पर्यटन मंत्र्यांनी मंजूर करून सुरू केले आहे त्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या दरम्यानच्या सभांमधून विशेष काही घडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड येथील सभेत अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असे म्हटले त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, टोपी कसली ? भरजरीची, सर्वसामान्यांच्या मते मुकुट वाटेल? सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचा, गोरगरिबांच्या फायद्याचा हा अर्थसंकल्प आहे हे महत्त्वाचे आहे. गोरगरिबांच्या कल्याणाचे बजेट असल्याने उगाच टीका करणे गैर आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी मध्येही उद्धव ठाकरे सभेसाठी येत आहे ते आता येत आहेत यापूर्वी आदित्य ठाकरे ही येऊन गेले. पण त्यांनी मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री पदाच्या काळात काय दिले हे महत्त्वाचे आहे. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालावधी सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधी मिळाला आहे सावंतवाडी शहरासाठी ५५ कोटींची पाणीपुरवठा योजना, माजगाव मधील ३२ कोटींचा धरण प्रकल्प, फुकेरी मधील सत्तर कोटींचा धरण प्रकल्प तसेच अनेक प्रकल्प मंजूर झाले आहेत .म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीत कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे आणि या विकासामुळे पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला त्यामुळे त्यांची नुसती सभा होईल विकास मात्र आम्हीच करू असे केसरकर म्हणाले.
मंत्री केसरकर म्हणाले,ज्या मराठा बांधवा कडे कुणबी दाखले आहेत त्यांनाच कुणबी दाखले देण्याचा निर्णय जुनाच आहे.त्यावरून कुणाची नाराजी उद्भवण्याची गरज नाही.मंत्री छगन भुजबळ हे सरकार मध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत ते नाराज नसून समता परिषद चे काम करत असल्याने ते कदाचित सरकार च्या निर्णयावर भाष्य करीत असावेत असे मत व्यक्त केले.तसेच मंत्रीमंडळ बैठकीत सर्व विषयावर चर्चा होत असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले मात्र मुख्यमंत्री त्यांना समज देतील भुजबळ ज्येष्ठ मंत्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी,राजन पोकळे, सचिन वालावलकर, अमित कामत क्षितिज परब आदि उपस्थित होते.