देवगड,दि.१ फेब्रुवारी
देवगड न्यायालयाने सोमवारी एका चेक अनादरीत प्रकरणात आरोपी उदय खानविलकर राहणार पुणे याची निर्दोष मुक्तता केली फिर्यादीने जामसंडे येथून आरोपीला पुणे येथे संन २०१५ ते २०१७ या काळामध्ये आंबे विकले होते त्याच्या देण्यापोटी आरोपीने फिर्यादिस रू १,८५,००० चां चेक दिला होता. परंतु फिर्यादी हा आरोपी बरोबर असलेला आंब्यांचा व्यवहार सिद्ध करू शकला नाही. तसेच सदर व्यवहारापोटी हा चेक दिला होता हे सिद्ध करू शकला नाही. तसेच त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा कोर्टासमोर आलेला नाही. या महत्त्वाच्या बाबी मेहरबान कोर्टासमोर आल्यामुळे समरी.के. न. १५/२८१८ या केसमध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे ॲड.शामसुंदर जोशी देवगड यांनी काम पाहिले.