कणकवली येथून माहेरी आलेली विवाहिता बेपत्ता

कणकवली दि .१ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली येथील काजल प्रवीण कांबळे ( वय 30, रा. राणे चाळ पटकीदेवी मंदिर, कणकवली ) ही विवाहिता आज १ जानेवारी रोजी सकाळी घरात कोणालाही न सांगता निघून गेली. काजल ही मागील काही महिने माहेरी वडिलांकडे राहत असून आज सकाळपासून बेपत्ता झाल्याची खबर अमर वसंत जैताळकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. काजल हि साडेपाच फूट उंच असून मोरपंखी रंगाचा टॉप व निळसर रंगाचा पायजमा घातलेला आहे. गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र , कानात कर्णफुले आहेत.