पिसेकामते येथे अज्ञाताकडून बागेला आग, ४७ हजारांचे नुकसान

कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील पिसेकामते कदमवाडी येथील प्रकाश शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 28 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या पिसेकामते येथील घरालगत 10 गुंठे जागेतील बागेला अज्ञाताने आग लावली. या आगीत 23 काजू , 10 आंबा कलमे, 1 चिकू, 8 अननस , जांभ झाडे तसेच ठिबक सिंचन पाईप जळून सुमारे 47 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.