कणकवली येथील अभिजीत पवार यांची आत्महत्या…

कणकवली दि.१ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली बांधकरवाडी बोभाटे चाळ येथील अभिजीत शंकरराव पवार (४२) यांनी राहत्या घरातील पडवी मधील वाशाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना सोमवार २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अभिजीत पवार यांनी गळफास का घेतला हे समजू शकले नाही. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. अभिजीत पवार यांच्या पश्चात दोन मुलगे, पत्नी असा परिवार आहे.