अनधिकृत वाळू वाहतूकप्रकरणी दोन डंपर ताब्यात

मालवण,दि .१ फेब्रुवारी

मालवण तालुक्यातील हिवाळे येथे अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर आज सायंकाळी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली.

मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे येथे वाळू भरून पोईप येथील रुपेश वर्दम यांच्या मालकीच्या डंपर क्रमांक एम एच ०७ सी ६१९४ तर गोवा येथील जीए ०५ एसटी २२०९ हे दोन डपंर अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करत असताना महसुलच्या पथकाला आढळून आले. हे डंपर अडवून पाहणी केली असता दोन्ही डम्पर मध्ये प्रत्येकी २ ब्रास वाळू आढळून आली. हे दोन्ही डम्पर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोईप मंडळ अधिकारी संतोष गुरव तलाठी योगेश माळी दिलीप ठाकूर व कोतवाल यांनी केली.