देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेजमध्ये मुंबई विद्यापीठाच्या उड्डाण महोत्सवाचे उद्घाटन

सावंतवाडी,दि .१ फेब्रुवारी

विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला शैक्षणिक विकास साधना पाहिजे आज त्यासाठी इंटरनेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही साधने त्यासाठी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे सिनेट मेंबर युवराज लखमराजे भोसले यांनी येथे केले मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व लोकमान्य संचलित देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये गुरुवारी उड्डाण महोत्सव 20 24 जे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भोसले बोलत होते यावेळी मुंबई विद्यापीठाच्या एक्सटेन्शन बोर्ड ऑफ स्टडीचे चेअरमन डॉक्टर कुणाल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून तर लोकमान्य ट्रस्ट सावंतवाडी सचिव पंढरी  परब अध्यक्षस्थानी होते यावेळी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन राऊत तांत्रिक सहाय्यक किरण पाटील सहाय्यक संतोष पाटील क्षेत्रीय समन्वयक महेंद्र ठाकूर उमेश परब लोकमान्य ट्रस्ट  सावंतवाडीचे नूतन संचालक सचिन मांजरेकर लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षत्रिय व्यवस्थापक बाळासाहेब पांडव लोकमान्य ट्रस्ट सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर एक्झिक्युटिव्ह महेश सातवसे देशभक्त गवाणकर महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस आदी उपस्थित होते