श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ

रस्सी खेच स्पर्धेत मायकल स्कूल, जेन्झी ॲकॅडमी,अंजुमन इस्लाम व अवर लेडी ऑफ गुड हेल्थ स्कूल विजेते

मुंबई,दि .१ फेब्रुवारी

मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २० ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रात सर्वत्र एक वेगळाच वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.

आज कुर्ला नेहरू नगर मैदानावर रस्सी खेच स्पर्धा वरळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तर स्पर्धेचे निरीक्षक म्हणून रवींद्र पाटील यांनी काम पहिले. या स्पर्धेत १७ वर्षा खालील मुले- मुली, पुरुष व महिला गटात स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकूण २८ संघांनी सहभाग घेतला होता.

१७ वर्षा खालील मुलींच्या ( ४०० कि. वजनी गट ) गटात अंजुमन खैरुल इस्लाम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला व स्वामी मुक्तांनंद स्कूलला व्दितीय क्रमांक तर जवाहर विद्या भवन विवेकानंद इंग्लिश स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.

१७ वर्षाखालील मुलांच्या ( ४८० कि. वजनी गट) अवर लेडी ऑफ गुड हेल्थ स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला व विवेकानंद इंग्लिश स्कूलने व्दितीय क्रमांक तर स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, जवाहर विद्या भवनने तृतीय क्रमांक पटकावला.

खुल्या पुरुष ( ६०० कि. वजनी गट) गटात जेन्झी ॲकॅडमीने प्रथम क्रमांक पटकावला, मायकल हायस्कूलने व्दितीय क्रमांक तर सेंट सॅबेस्टीन स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.

खुल्या महिला ४८० कि. वजनी गट) गटात मायकल स्कूल प्रथम क्रमांक पटकावला, विवेकानंद इंग्लिश स्कूलने व्दितीय क्रमांक तर सेंट सेबस्टीन हायस्कूल.

या स्पर्धेला विल्सन बाबुराव वरळीकर हे रस्सी खेच संघातानेतर्फे, सोनावणे, रवींद्र पाटील व सुभाष पाटील हे महापालिकेकडून तर क्रीडा भारती तर्फे जयवंत सिंग यांनी कामकाज पहिले.