वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची तळवडे येथे बैठक

तळवडे येथील वीज ग्राहकांच्या जाणून घेणार समस्या

सावंतवाडी,दि .१ फेब्रुवारी

सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची तळवडे विभागीय बैठक शनिवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३.०० वा. ग्रामपंचायत हॉल तळवडे येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत तळवडे सह आजूबाजूच्या गावातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तरी वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी लिखित स्वरूपात तक्रार अर्ज घेऊन बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड व नारायण जाधव अध्यक्ष तंटामुक्ती समिती तळवडे यांनी केले आहे.