आर पी डी हायस्कूल, सावंतवाडी मधील एसएससी १९७६ बॅचचे गेट टुगेदर

सावंतवाडी,दि .१ फेब्रुवारी
आपल्या शालेय जीवनातील रम्य व सुखद स्मृतींना उजाळा देत व आस्था व्यक्त करीत तब्बल ४८ वर्षांनी एकत्र आलेल्या १९७५-७६ च्या आर पी डी हायस्कूल, सावंतवाडी मधील एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर कार्यक्रम आर पी डी हायस्कूल, सावंतवाडीमध्ये उत्साहवर्धक वातावरणात नुकताच संपन्न झाला.
यावेळी सुरुवातीला श्री सरस्वती देवीचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली. सर्वांनी आपापली ओळख करून दिल्यानंतर, हयात नसलेल्या मित्र मैत्रिणी आणि गुरुजनांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पहिल्या सत्रामध्ये ‘ उपस्थितांनी आपापल्या जुन्या आठवणी सांगून शाळेतील स्मृती जाग्या केल्या आणि तद्नंतर एकत्र भोजन करून शाळेच्या आवारात फेरफटका मारला.

दुसऱ्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांनी गाणी म्हणून आपल्या कला गुणांचे सादरीकरण केले. संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष श्री विकास सावंत, मुख्याध्यापक श्री जगदीश धोंड, खजिनदार श्री सी एल नाईक, संचालक श्री अमोल सावंत आणि त्यावेळचे शिक्षक तसेच संस्थेचे सेक्रेटरी श्री व्हि बी नाईक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणेत आला, तसेच संस्थेस सन्मानचिन्ह व देणगी देणेत आली.