कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये फोंडाघाट चा गौरव रेवडेकर प्रथम

फोंडाघाट,दि .१ फेब्रुवारी (संजय सावंत)
कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग संलग्न महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि वायंगणकर फिटनेस आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित पुरुष व महिला भव्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा 2024 देवगड येथे आयोजित स्पर्धे मध्ये फोंडाघाट चा कु.गौरव केदार रेवडेकर याने 105 kg सब.जुनियर मुले गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
दरम्यान देवगड याठिकाणी पार पडलेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता .या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सुवर्णकार महेश घारे माजी जि प सदस्या सौ मनस्वी घारे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . या पॉवर लिफ्टिंग स्पर्धा निरनिराळ्या वजनी गटात खेळवल्या गेल्या होत्या वजनी गटानुसार सविस्तर निकाल पुढील प्रमाणे:
जूनियर मुली (५२किलो) तेजल बागडे किलो प्रथम,(५७किलो) प्रसन्ना परब प्रथमअस्मिता तेली द्वितीय, (६३किलो) मुली रेश्मा ठोकरे प्रथम, नेहा लाड (६९ किलो) प्रथम, सब जुनियर मुले ५३ आराध्य चौगुले प्रथम ,पार्थ खेडेकर द्वितीय, आर्यन धुवाळी तृतीय, (५९ किलो) श्रेयस धुवाळी, प्रथम, सर्वेश सकपाळ द्वितीय अल्केश तेली तृतीय, (६६ किलो) पृथ्वीराज राठोड प्रथम वैभव वरक द्वितीय, (७४ किलो) यश सावंत प्रथम,तीर्थेश करंगुटकर द्वितीय,गतिक परब तृतीय, (८३ किलो )तौसिक शेख प्रथम यश लोके द्वितीय, सब जूनियर मुले(९३ किलो)रुद्र देसाई प्रथम तर (१०५किलो) वजनी गटात फोंडाघाट चा गौरव रेवडेकर प्रथम आला.
जूनियर मुले(५३किलो) शुभम गावडे प्रथम, अभिषेक जयस्वाल द्वितीय ,५९(किलो) विशाल लाड प्रथम, वासुदेव गडदे द्वितीय, रोहित झोरे तृतीय ,(६६ किलो)बाळकृष्ण परब प्रथम तौसिद सोलकर द्वितीय ,ओंकार गुरव तृतीय, (७४किलो) गौरांग गायकवाड प्रथम, बबली करमळकर द्वितीय, प्रथमेश वाळके तृतीय,(८३किलो) राहुल पुजारे प्रथम,जतीन आचरेकर द्वितीय, सीनियर मुले (६६ किलो)प्रणित घुमडे प्रथम, प्रथमेश पराडकर द्वितीय, (७४ किलो)आयुब नाईक,प्रथम,राहुल माठेकर द्वितीय,रामचंद्र केसरकर तृतीय ,(८३किलो) स्वप्निल सावंत, प्रथम जयेश ओटवकर, द्वितीय , संजय केळुस्कर तृतीय (९२ किलो)ओंकार कुबडे प्रथम परिमल नलावडे द्वितीय या प्रमाणे विजयी ठरले त्यांना पारितोषिक प्रमाणपत्र देऊन मान्यवर प्रायोजक महेश घारे, सौ .मनस्वी घारे,यांच्या हस्ते गौरविण्यात आहे.
मास्टर गट १ (५९किलो)प्रथम क्रमांक गोंविंद कलंबटे देवगड,( ७४ किलो)प्रथम क्रमांक प्रदीप रमेश नारकर,
द्वितीय -अतुल कासार सावंत वाडी,तुतीय-शशांक साटम देवगड,मास्टर गट २)(७४किलो)प्रथम क्रमांक सुरेश कदम,(९३किलो )प्रथम क्रमांक संजय साटम देवगड
महिला मास्टर गट १ (५२ किलो)प्रथम मनीषा आग्रीत आचरा,(५७ किलो )प्रज्ञा पेडणेकर आचरा,(६३ किलो)टीना चौगुले जामसंडे,(७६किलो )आशा हजारे आचरा,८४ किलो)स्मिता पोरे सावंतवाडी,मास्टर महिला गट २ (५७ किलो)प्रथम क्रमांक -चेतना चव्हाण आचरा,
स्ट्रॉग मॅन सबज्युनिअर मुले तौफिक शेख,ज्युनिअर मुले बाळकृष्ण परब,सिनिअर मुले ओंकार कुबडे,मास्टर गोविंद कलंबटे,स्ट्रॉंग वुमन सबज्युनिअर मुली यशश्री परब,ज्युनिअर मुली प्रसन्ना परब,सिनिअर मुली सायली घाटे,मास्टर टीना चौगुले,स्ट्रॉंग मन ऑफ सिंधुदुर्ग ओंकार कुबडे,स्ट्रॉंग वुमन ऑफ सिंधुदुर्ग सायली घारे याना गौरविण्यात आले.