ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचा जिल्हा मेळावा व कार्यशाळा

४ फेब्रुवारी रोजी मालवण- कोळंब येथे आयोजन युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

तळेरे,दि २ फेब्रुवारी

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळा रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी मालवण-कोळंब पुलाजवळ समर्थ मंगल कार्यालय येथे
आयोजित करण्यात आली आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड.राजेंद्र पैलवान भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, एम.एस.ई.बी.मेडिक्लेम विभाग प्रमुख डॉ. अमोल धर्मजिज्ञासू, मालवण तहसीलदार वर्षा झालटे-भोसले, देवगड तहसीलदार आर.जे.पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य निरिक्षक घन:श्याम सांडीम, राज्य सचिव राकेश शिंदे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी या जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेमध्ये स्वेच्छेने कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार काणे किंवा कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्याशी संपर्क साधून उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे जिल्हा सचिव अर्जुन परब यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक
मोबाईल नं.९४०५२८८१८८/९१४६२८८१८८ यांच्याशी संपर्क साधावा.