मंत्री पद मिळाले तरीही दिपक केसरकर जनतेसाठी काहीही करू शकले नाही…

उध्दव ठाकरे यांनीच केसरकर यांना मंत्री बनवले होते हे विसरू नये-तालुकाप्रमुख रूपेश राऊळ

सावंतवाडी,दि.२ फेब्रुवारी 
मंत्री पद मिळाले तरीही दिपक केसरकर जनतेसाठी काहीही करू शकले नाही त्यामुळे ते स्वतः चे अपयश झाकण्यासाठी केसरकर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर टीका करत आहेत. उध्दव ठाकरे यांनीच केसरकर यांना मंत्री बनवले होते हे विसरू नये असा इशारा ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला.

शिवसेना कार्यालयात शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ बोलत होते यावेळी उपसंघटक मायकल डिसोझा, अशोक परब,आबा केरकर, अशोक धुरी, शहरप्रमुख शैलेश गंवढळकर आदी उपस्थित होते.

रूपेश राऊळ म्हणाले, माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत.पहीले सावंतवाडीत येतील त्यामुळे शिवसैनिक आणि जनतेत उत्साह आहे. अनेकांनी साहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.तर काही जणांना साहेबांच्या दौऱ्याची भिती वाटते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे दौऱ्यावर आल्यावर विचार, विकास घेऊन येतात. त्यामुळे दिपक केसरकर यांना भिती का वाटते. उध्दव ठाकरे यांनी मंत्री पद देऊनही ते टिका करतात. केसरकर तुम्हाला मंत्री पद मिळूनही स्वतः च अपयश झाकण्यासाठी पुड्या सोडण्याचे काम करत आहेत.ते बंद करा असे राऊळ यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोखठोक बोलतील. कोकण, सिंधुदुर्ग व सावंतवाडी मतदार संघाच्या विकासावर बोलतील केसरकर तुम्हाला किती तरी प्रश्नावर अपयश आले आहे. केसरकर खचलेल्या परिस्थिती वैफल्यग्रस्त होऊन टिका करत आहेत. केसरकर विकास कार्यक्रम राबविण्यात अपयशी ठरले आहेत
उध्दव ठाकरे देव माणूस, आदित्य ठाकरे उमदे व्यक्तीमत्व आहे असे म्हणणारे केसरकर आज वैफल्यग्रस्त होऊन टिका करत आहेत. केसरकर यांचा सपशेल पराभव होणार आहे जनता नाराज आहे ते अपयश लपविण्यासाठी केसरकर करत असलेले प्रयत्न सपशेल खोटा ठरेल असा विश्वास रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला.