ओटवणेत ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्दघाटन

गोवा आणि महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडूंच्या क्रिकेटचा थरार

सावंतवाडी,दि २ फेब्रुवारी
ओटवणे चौगुले मित्रमंडळ आणि गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य खुल्या ध्रुव चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे उद्दघाटन शुक्रवारी सकाळी थाटात करण्यात आले. ओटवणे येथील कु ध्रुव बबलू गावकर याच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट शौकिनांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत गोवा आणि महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडूंच्या क्रिकेटचा थरार क्रिकेट शौकीनांना पहायला मिळणार आहे. लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा समावेश असून क्रिकेट रसिकांना चौकार व षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. ओटवणे सारख्या ग्रामीण गावातील क्रिकेटचा कुंभमेळा

या स्पर्धेचे उद्दघाटन सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सरपंच आत्माराम गावकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रविंद्र गावकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सगुण गावकर पोलिस पाटील शेखर गावकर,
ग्रामपंचायत सदस्य समिक्षा गावकर, प्रशांत बुराण, सामजिक कार्यकर्ते बाळा गावकर, बाळकृष्ण भगत, प्रमोद गावकर, संजय कविटकर, मुंबई मंडळाचे समन्वयक दशरथ गावकर, महेश गावकर, संदीप जाधव, लुमा जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी ध्रुव गावकर याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या स्पर्धेत मालवणी कॉमेंट्रीचे बादशाह बादल चौधरीसह जय भोसले, गुरू चिटणीस, महेश चव्हाण आदी मालवणी, हिंदी व मराठीत समालोचन करत आहेत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून महेश डोंगरे, संजय हळदणकर आणि गुणलेखक अमोल केसरकर करत आहे.