आशिये प्राथमिक शाळा नवीन इमारत बांधकामासाठी ४० लाख मंजूर

सरपंच महेश गुरव यांची माहिती ;जिल्हा वार्षिक योजनेतून निधी

कणकवली दि.२ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली आशिये जि. प.पू .प्राथमिक शाळा आशिये नवीन इमारत बांधकामासाठी तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.या आशिये प्राथमिक शाळा नवीन इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी ४० लाख मंजूर झाला असल्याची माहिती आशिये सरपंच महेश गुरव यांनी दिली.हा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आ.नितेश राणे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.