मालवण,दि.२ फेब्रुवारी
शासकीय चित्रकला इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले असून प्रशालेचा विद्यार्थी पार्थ साईनाथ मेस्त्री याने राज्यात चौथा क्रमांक मिळवीत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. तर मयुरेश दिलीप वायंगणकर याने राज्यात ९२ वा क्रमांक मिळविला असून या दोघांसह जान्हवी प्रमोद चव्हाण व श्रावणी रवींद्र नेवाळकर यांनी अ श्रेणी प्राप्त केली आहे.
शासकीय चित्रकला इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेसाठी भंडारी हायस्कुलचे १७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८३ टक्के निकाल लागला. यामध्ये चार विद्यार्थी अ श्रेणीत, दोन विद्यार्थी ब श्रेणीत तर आठ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून लाखो विद्यार्थ्यां मधून फक्त शंभर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट काढण्यात येते, यामध्ये भंडारी हायस्कुलच्या पार्थ साईनाथ मेस्त्री याने चौथा क्रमांक मिळवीत उत्तुंग यश मिळविले आहे. तसेच पार्थ याने वस्तूचित्र प्रकारात राज्यात पहिला क्रमांक व स्मरण चित्र प्रकारात राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. तर प्रशालेच्या मयुरेश दिलीप वायंगणकर याने राज्यात ९२ वा क्रमांक पटकावत सुयश मिळविले आहे.
प्रशालेचा निकाल पुढीलप्रमाणे – अ श्रेणी – पार्थ मेस्त्री, मयुरेश वायंगणकर, जान्हवी चव्हाण, श्रावणी नेवाळकर. ब श्रेणी – भूमिका प्रसाद केळूसकर, वैभवी नितीन तळगावकर. क श्रेणी – विश्वदिप रामचंद्र बनसोडे, जयेश मंगेश धुरी, श्रावणी लाडोबा गावकर, मिताली महेश लाड, मंदार भूषण माडये, हर्षल महेश सांडव, भावेश ललितकुमार वराडकर, रोहित समीर वेतुरेकर.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे तत्कालीन कलाशिक्षक अरविंद जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक एच. बी. तिवले व इतर संस्था पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.