जनता नारायण राणे व दिपक केसरकर यांची गद्दारी विसरणार नाही – आ.वैभव नाईक

केसरकर राणेंचा दहशतवाद विसरले ;आपल्या पक्षाचं अस्तित्व नसल्याचे केसरकरांना मान्य

कणकवली दि.२ फेब्रुवारी(भगवान लोके)

राणेंचा दहशतवाद पुढे आणणारे केसरकर आज राणेंचा दहशतवाद विसरले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री असताना आपल्या पक्षाचं अस्तित्व नसल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे,त्यामुळेच नारायण राणेंना उमेदवारी भाजपकडून जाहीर झाल्यास आपला पाठिंबा असल्याचे केसरकर सांगताहेत.कोकणी जनता नारायण राणे व दिपक केसरकर यांची गद्दारी विसरणार नसल्याचा इशारा शिवसेना आ.वैभव नाईक यांनी दिला आहे.

कणकवली येथे आ.वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दिपक केसरकर यांनी वेळावेळी राणेंच्या दहशतीविषयी खूलेआम बोलत होते.ज्यावेळी नारायण राणे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी केसरकर यांना नियाेजन समितीच्या बैठकीतून बाहेर काढले हे केसरकर विसरले असतील. परंतु कोकणात जनता विसरली नाही. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असल्यास पाठिंबा दिला, हे केसरकर गद्दार आहेत, काेकणी जनता काही विसरत नाही. लोकसभेत उभे राहिल्यास नारायण राणेंचा पराभव अटळ असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.