कळसुलकर महाविद्यालयात तिळगूळ समारंभ उत्साहात

वेंगुर्ला,दि.२ फेब्रुवारी

मकर संक्रांतीचा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचे औचित्य साधत कळसुलकर महाविद्यालयाच्या परंपरेनुसार तिळगूळ समारंभ व साडी, टाय डे चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालय प्रमुख श्री.पाटील यांनी केले. प्रभारी मुख्याध्यापक श्री. भुरे सर व वरिष्ठ लिपिक श्री. केंकरे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या शिक्षिका श्रीम.परब व श्रीम.नाईक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात तिळगुळाची देवाणघेवाण व शुभेच्छांसह शेलापागोटे व संगीत खूर्ची खेळाचेही आयोजन करण्यात आले होते. सर्व उपक्रमांचा उपस्थितांनी आस्वाद घेतला.