वेंगुर्ला,दि.२ फेब्रुवारी
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने सलग दहाव्या वर्षी लिहित्या हाताना व्यासपीठ मिळावे म्हणून खुल्या आणि शालेय गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही स्पर्धेत सिंधुदुर्गासह अगदी मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, गोवा, सातारा, पुणे, नाशिक, शिर्डी, जळगाव, रत्नागिरी, अहमदनगर आदी ठिकाणांहून स्पर्धक सहभागी झाले.
शालेय गटासाठी ‘आमचे आदर्श कोण? शिक्षक की सेलिब्रिटी‘ हा विषय होता. यात ८९ शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम- मंगल देवदास मुळीक (मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल), द्वितीय- गायत्री लक्ष्मण वरगांवकर ( न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), तृतीय- प्रणव सखाराम घाडी, खुल्या निबंध स्पर्धेसाठी ‘दररोजचा दीड जीबी डेटाः बेरोजगारीची न होणारी जाणीव‘ हा आगळा-वेगळा विषय देण्यात आला होता, यात एकूण ४५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. प्रथम- विष्णू पांडुरंग दळवी, द्वितीय-निता नितिन सावंत, तृतीय रामा वासुदेव पोळजी यांनी क्रमांक पटकाविले. निबंध स्पर्धचे परीक्षण प्रा.डॉ. पी.आर.गावडे यांनी केले.